अत्याधूनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान : माजी आमदार राजाराम महाजन

माजी आमदार राजाराम (गणू) महाजन महादेव हॉस्पिटलला सदिच्छा भेट


जळगाव (11 जुलै 2026) : महादेव हॉस्पीटलमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांची सेवा जळगावकरांसाठी वरदान ठरत असल्याचे माजी आमदार राजाराम (गणू) महाजन यांनी जळगाव येथील महादेव हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरला सदिच्छा भेटीत केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी त्यांच्यासोबत गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, हृदयरोगतज्ज्ञ डॉ. वैभव पाटील तसेच रुग्णालयातील इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थित डॉक्टरांनी महादेव हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक निदान यंत्रणा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया सुविधा, अतिदक्षता विभाग, आपत्कालीन सेवा तसेच रुग्णकेंद्रित उपचार पद्धतीची माहिती महाजन यांना दिली.महाजन यांनी रुग्णालयातील स्वच्छता, आधुनिक वैद्यकीय उपकरणे, डिजिटल आरोग्य सेवा आणि अनुभवी डॉक्टरांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना महानगरांमध्ये न जाता दर्जेदार व आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महादेव हॉस्पिटलचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

महादेव हॉस्पिटलमध्ये विविध सुपरस्पेशालिटी सेवा, हृदयरोग उपचार, शस्त्रक्रिया, अत्याधुनिक निदान सुविधा तसेच शासकीय आरोग्य योजनांअंतर्गत उपचार उपलब्ध असून रुग्णांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.महानगरातील सुविधा जळगाव शहरातच आणि योजनेंतर्गत मिळत असल्याने नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !