मांडकी देवस्थानात उद्या भंडार्यासह विविध कार्यक्रम
भडगाव (12 जुलै 2026) : भडगाव तालुक्यातील श्री क्षेत्र मांडकी येथील श्री संत सदगुरु बाळु मामा मंदिरावर सोमवार, 13 रोजी सोमवती अमावस्यानिमित्त भंडार्यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
असे आहे दिवसभरातील कार्यक्रम
सोमवारी पहाटे पाच वाजता श्रींचे पाद्य पूजन व अभिषेक, सकाळी 7.30 वाजता अमावस्या आरती, संध्याकाळी 7.30 वाजता अमावस्या महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. यावेळेस अन्नदानाची सेवा कै.दादासाहेब दिलीप रमेश पाटील यांच्या स्मरणार्थ रमेश ताथु पाटील (पिंपळगाव बुद्रुक, ता.भडगाव) करतील.

भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मांडकी गावातील सर्व भाविक मंडळी व मंदिराचे पूजारी हभप सुभाष धनराज चौधरी यांच्यासह पूजारी मंडळींनी केले आहे. या कार्यक्रमानिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईसह साज सजावट करण्यात आली आहे. अमावस्येला कार्यक्रमानिमित्त या मंदिरावर हजारोंच्या संख्येने दरवेळी भाविकांची अलोट गर्दी होते.
