गोदावरी इंजिनिअरिंगमध्ये राष्ट्रीय ईव्ही शिक्षक विकास कार्यक्रम उत्साहात

देशभरातील 275 प्राध्यापक, संशोधक व तज्ज्ञांचा उत्स्फूर्त सहभाग


जळगाव (मंगळवार, 14 जुलै 2026) : गोदावरी फाउंडेशनच्या गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त संस्था), विद्युत अभियांत्रिकी विभागामार्फत आयोजित इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान आणि सहाय्यक प्रणाली या विषयावरील पाच दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रमाचा उत्साहात समारोप करण्यात आला. ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला देशभरातील विविध राज्यांतील 275 प्राध्यापक, संशोधक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील यांच्या प्रेरणेतून तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पाच दिवस चाललेल्या या राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान, चार्जिंग प्रणाली, स्मार्ट ग्रिड, ऊर्जा साठवणूक, सौर ऊर्जेवर आधारित ईव्ही चार्जिंग, फ्युएल सेल तंत्रज्ञान, गणितीय मॉडेलिंग आणि ऑप्टिमायझेशन अशा अत्याधुनिक विषयांवर देशातील नामवंत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

पहिल्या दिवशी डॉ.पी.व्ही.व्ही.रामाराव यांनी चार्जिंग तंत्रज्ञान तर डॉ.एन.एम.जी.कुमार इव्ही वाहनांच्या विश्वासार्हतेचे मुल्यांकन दुसर्‍या दिवशी डॉ.वरप्रसाद जनामला यांनी स्मार्ट ग्रिड वातावरणात व्हेईकल टू ग्रिड ऑपरेशन, डॉ. बी. काव्या संतोषी यांनी शाश्वत वाहतुकीसाठी बुद्धिमान सौर ईव्ही चार्जिंग प्रणाली आधुनिक संकल्पना मांडल्या.तिसर्या दिवशी डॉ. सुदर्शन एल. चव्हाण यांनी पीईएम इंधन सेल इलेक्ट्रिक वाहनांत ग्राफीन आधारित नॅनो-कॉम्पोझिट मटेरियलच्या वापराविषयी, डॉ.वरप्रसाद जनामला यांनी स्मार्ट ग्रिडच्या कार्यासाठी फ्युएल सेल इलेक्ट्रिक वाहनाच्या ऊर्जा साठवण प्रणालीची रचनावर मार्गदर्शन केले.

चौथ्या दिवशी प्रा.के.वैसाख यांनी ईव्ही तंत्रज्ञानातील इष्टतमीकरण,डॉ. हेमचंद्र जी. यांनी इलेक्ट्रिक वाहनांचे गणितीय प्रारूपण वरील तांत्रिक बाबी स्पष्ट केल्या. अंतिम दिवशी प्रा. के. वैसाख यांनी ईव्ही ऑप्टिमायझेशनसाठी सॉफ्ट कम्प्युटिंग पद्धती, डॉ. हेमचंद्र जी. यांनी मॅटलॅब/सायलॅब आधारित प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सत्र घेऊन सहभागी प्राध्यापकांना आधुनिक सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांचे मॉडेलिंग व विश्लेषणाची माहिती दिली. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. महेश एच. पाटील तर समन्वयक डॉ. सचिन आर. महेश्री यांनी तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. हर्षल मयूर पाटील यांनी केले. गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील तसेच डॉ. अनिकेत पाटील यांनी विद्युत अभियांत्रिकी विभागाचे अभिनंदन करून अशा राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांमध्ये संशोधनाभिमुख दृष्टीकोन विकसीत होण्यास मोठी मदत होत असल्याचे सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !