शेतकरी शिवसेना भडगाव तालुकाध्यक्षपदी सोमनाथ पाटील
भडगाव (गुरुवार, 16 जुलै 2026) : भडगाव तालुक्यातील बोदर्डे येथील आदर्श शेतकरी सोमनाथ भालचंद्र पाटील यांची शेतकरी शिवसेना भडगाव तालुका प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती राज्याचे शिवसेनेचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पाचोरा-भडगाव आमदार किशोर पाटील यांच्या शिफारसीनुसार करण्यात आली.
मित्र परिवाराकडून सत्कार
शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख सुनील रंगराव पाटील (पाचोरा) यांची नियुक्ती पत्रावर स्वाक्षरी आहे. नियुक्ती पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्याहस्ते देण्यात आले. शिवसेना पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा पत्राद्वारे वय्क्त करण्यात आली.


शेतकरी शिवसेनेच्या भडगाव तालुका प्रमुखपदी शेतकरी सोमनाथ पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल भडगाव येथे त्यांचा मित्र परीवारामार्फत शाल, टोपी, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकरी सहकारी संघाचे संचालक अमोल पाटील, संचालक गुलाब पाटील, शिवसेना तालुका संघटक रवी पाटील, वाक येथील माजी उपसरपंच कुणाल पाटील, पत्रकार अशोक परदेशी, वाक येथील निळु पाटील यांच्यासह मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
सत्काराचा छोटेखानी कार्यक्रम भडगाव येथील महेश डोर अॅण्ड प्लाय या दुकानावर करण्यात आला. यावेळी सोमनाथ पाटील यांना निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.