सुनसगावात ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून तांब्याची तार चोरली : सहा जणांविरोधात गुन्हा
भुसावळ (रविवार, 30 ऑगस्ट 2026) : भुसावळ तालुक्यातील सुनसगाव ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून 10 किलो वजनाची सुमारे 10 हजार रुपये किंमतीची तांब्याची तार चोरी केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली.
असे आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनसगाव ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून जळगावसह सुनसगावच्या संशयीतांनी संगनमत करीत 10 किलो वजनाची तांब्याची तार चोरी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईश्वर अंकुश पाटील (28, नशिराबाद, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलिसात रोहित संजय बोदडे, आकाश एकनाथ सोनवणे, अजय विश्वास खरोटे, रोशन रमेश सपकाळे (सर्व रा.सुनसगाव, ता.भुसावळ), अजीज आझाद खाटीक, हर्षद शरीफ खाटीक (दोन्ही रा.सुप्रीम कॉलनी, जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार धीरज मंडलिक करीत आहेत.

