यावल शहरात समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव
यावल (मंगळवार, 31 ऑगस्ट 2026) : विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हायचं असेल तर मोबाईलचा आणि सोशल नेटवर्कचा वापर कमी करावा, तसेच ज्या समाजाने आपल्याला सन्मानीत केले त्या समाजाचे ऋण व्यक्त करतांना आपण यशस्वी झाल्यानंतर या समाजातील गरजूंना मदतीसाठी पुढे हात करावा, असे आवाहन आमदार अमोल जावळे यांनी केले. ते यावल शहरातील सुमाई मंगल कार्यालयात आयोजित समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते.
यांची होती उपस्थिती
शहरातील भुसावळ टी पॉईंटजवळ असलेल्या सुमाई मंगल कार्यालयात समस्त सूर्यवंशी बारी समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम झाला. रविवारी आयोजित अध्यक्षस्थानी अंतुर्ली येथील प्राचार्य बाळू बारी होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार अमोल जावळे, नगरपालिकेच्या भाजपच्या गटनेता नंदा महाजन, नगरसेविका वैशाली बारी, डॉ.रमेश बारी, डॉ.नितीन बारी, बाळकृष्ण खलसे, तुकाराम खलसे, शिवाजी पाटील, बबिता बारी, रमेश बारी, अशोक अस्वार, नामदेव अस्वार, पवन पाटील, प्रकाश खलसे, नगरसेवक सागर चौधरी, योगेश चौधरी, उमेश फेगडे, बाजार समितीचे सभापती उज्जैनसिंग राजपूत सह मान्यवरांची उपस्थिती होती.

सोशल नेटवर्कचा वापर मर्यादित करावा
आमदार अमोल जावळे यांनी मोबाईल आणि सोशल नेटवर्कचा वापर मर्यादित करावा व आपल्या मोबाईलमधील कॅमेर्याचा वापर आणि कॅल्क्युलेटरचा वापर याची तुलना केल्यास आपण कॅमेराचा वापर अधिक करतो. समाजासाठी आपण यशस्वी झाल्यानंतर समाजातील गोर-गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.
यांनी घेतले परिश्रम
गणपत मोहन अस्वार, विलास वसंत खलसे यांनी चषक बनवून दिले तर दर्शन राजेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी प्रमाणपत्र तयार करून दिले होते. सूत्रसंचालन नितीन अशोक बारी व संगीता परमानंद बारी यांनी केले. कार्यकारणी अध्यक्ष निलेश नागपुरे, विलास मुरलीधर काटोले, राजेंद्र काळे, माजी नगरसेवक सुनील वासुदेव खलसे-बारी यांनी परिश्रम घेतले.
