भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात हॉकीच्या जादूगरांची जयंती उत्साहात साजरी


भुसावळ (मंगळवार, 31 ऑगस्ट 2026) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनी हॉकीचे जादुगार महान खेळाडू मेजर ध्यानचंदजी यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.राजू फालक यांच्याहस्ते पूजन करण्यात आले.

मैदानाशी मैत्री करणे गरजेचे
प्राचार्य डॉ.राजू फालक म्हणाले की, 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन हा दिवस आपल्या देशाच्या गौरवशाली क्रीडा परंपरेचे प्रतीक आहे. मेजर ध्यानचंद हे आपल्या उत्कृष्ट हॉकी कौशल्याने भारताचे नाव जगभरात उज्ज्वल करणारे महान खेळाडू होते. त्यांच्या जीवनातून शिस्त, समर्पण, मेहनत आणि देशभक्ती यांचा आदर्श आपल्याला मिळतो. खेळ हा केवळ पदक जिंकण्यासाठी नसून तो निरोगी शरीर, सकारात्मक विचार आणि उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्याचे माध्यम आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक विद्यार्थ्याने मोबाईलपासून थोडा वेळ दूर राहून मैदानाशी मैत्री करणे गरजेचे आहे.

यांची होती उपस्थिती
यावेळी क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जयश्री भंगाळे, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.खिलचंद धांडे, प्रा.कबीर गवळी, प्रा.चेतन पारखे, प्रा.कामिनी चौधरी, प्रा.रोहिणी भारंबे, प्रा.स्मिता पाटील, प्रा.सविता जंगले, प्रा.रंजना ढाके, प्रा.सागर सोनावणे, प्रा.अजय साळुंखे, प्रकाश चौधरी भाग्येश वाघुळदे, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !