दीपनगरातून पाच टन कोळसा चोरला : फुलगावच्या सहा संशयीतांविरोधात गुन्हा


भुसावळ (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) :  दीपनगर केंद्र परिसरातील रेल्वे सायडींग, रेल्वे ओव्हर ब्रिजजवळ मंगळवार, 1 रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास सहा संशयीतांनी सुमारे 20 हजार रुपये किंमतीचा पाच टन चोरल्याचा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्याने भुसावळ तालुका पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण ?
सुरक्षा अधिकारी सोमेश्वर मधुकर जाधव (29, खडका, ता.सोनपीठ, ह.मु.दीपनगर वसाहत) यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र परिसरातील रेल्वे सायडींग, ओव्हर ब्रिजजवळ कोळसा चोरी होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतल्यानंतर संशयीतांनी 20 हजार रुपये किंमतीचा कोळसा लांबवला. तपास परिवेक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक हेमंत मिटकरी करीत आहेत.






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !