भुसावळात मुलांच्या हातून साकारला जाणार पर्यावरणपूरक बाप्पा !
भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळ, दैनिक दिव्य मराठी, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी व सोनिच्छा ड्रॉईंग क्लासचा उपक्रम
भुसावळ (बुधवार, 2 सप्टेंबर 2026) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मुलांमध्ये सर्जनशीलता आणि पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी भुसावळात शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची पर्यावरणपूरक कार्यशाळा गुरुवार, 10 ऑगस्टला आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे रासायनिक रंगांना फाटा देत या कार्यशाळेत मुलांच्या हातून पर्यावरण पूरक ‘बाप्पा’ साकारले जाणार आहेत.
विद्यार्थ्यांना बाप्पांची मूर्ती तयार करण्याची संधी
प्रतिष्ठा महिला मंडळ, दैनिक दिव्य मराठी, रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी, इनर व्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी आणि सोनिच्छा ड्रॉईंग क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा गुरुवार, 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता संतोषीमाता हॉल, मातृभूमी चौक, भुसावळ येथे होणार आहे. मुलांसाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा निःशुल्क असून सहभागी विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याची संधी मिळणार आहे.

प्रमाणपत्रही मिळणार
कार्यशाळेसाठी लागणारी शाडूमाती प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल शिवाय कार्यशाळेत सहभागी होणार्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नावनोंदणी आवश्यक
कार्यशाळा निःशुल्क असली तरी पूर्व नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी कोणाचीही नावे नोंदवून घेतली जाणार नसल्याचे आयोजकांनी कळविले आहे.
सहभागी विद्यार्थ्यांनी या वस्तू आणाव्यात
मूर्ती ठेवण्यासाठी जाड पॅड किंवा पुठ्ठा, पाण्यासाठी छोटा मग, पिण्याच्या पाण्याची बाटली, नाश्त्याचा डबा, नॅपकीन,
जुना न्यूज पेपर आणावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देणार्या या उपक्रमात जास्तीत जास्त मुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी येथे करा संपर्क
जयश्री चौधरी (9158823288), अनिता आंबेकर (9623037418)
सोनल महाजन (913037418), वैशाली सैतवाल (9511886655), राजश्री बादशाह (8600783976), हिमाली फालक (9823775818), ज्योती राठोड (9503688911), योगीता वायकोळे (8928575223), कविता पाचपांडे (9422224751), जान्हवी पाटील (9420557941) या क्रमांकावर नाव नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


