भुसावळात रेल्वे सेवानिवृत्त कर्मचार्यांचा सेमिनार : प्रलंबित समस्या सोडवण्याचे आश्वासन
भुसावळ (गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026) : शहराजवळील चोरवड येथे रेल्वेच्या विद्युत इलेक्ट्रिक लोको शेडमधील सेवानिवृत्त कर्मचार्यांचा विशेष सेमिनार रविवार, 25 ऑक्टोबर रोजी उत्साहात झाला. या कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचार्यांच्या विविध प्रलंबित समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून रेल्वेच्या डीआरएम कार्यालयातील असिस्टंट पर्सनल ऑफिसर समाधान हिवाळे, मुख्य कार्यालय अधीक्षक उमाकांत बाविस्कर प्रामुख्याने उपस्थित होते. सेमिनार दरम्यान सेवानिवृत्त कर्मचार्यांनी आपल्या विविध अडीअडचणी व समस्या मांडल्या.
यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुण्यांनी सर्व समस्या अत्यंत सकारात्मकतेने जाणून घेतल्या आणि त्यांच्या या समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन रेल कामगार सेनेचे मंडळ अध्यक्ष ललितकुमार मुथा यांनी केले होते.
2005 ते 2026 पर्यंत सेवानिवृत्त झालेले रेल्वे कामगारांसह प्रल्हाद पवार, व्ही.टी.जगदेव, पी.ए.महाजन, एस.आर.चौधरी, व्ही.डी.सोनकुसरे, एच.आर.पाटणकर, प्रेमचंद कचवे, चंद्रकांत पाटील, किरण पाटील, सतीश कोल्हटकर, समाधान हिवाळे, नूर मोहम्मद, ए..हसन, शिवाजी वाढे, सुरेश महाले, गोकुळ कोळी, विजय बर्हाटे, पांडुरंग इंगळे, देविदास सोनार, एस.सी.इलामे यांच्यासह मोठ्या संख्येने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन ललितकुमार मुथा यांनी तर आभार गोविंदा भोळे यांनी मानले.