वरणगाव ऑर्डनन्सच्या कर्मचार्याचे सतर्कतेमुळे वाचले प्राण
वरणगाव- वरणगाव परीसरात संततधार पावसाने लवकी या नाल्याला पूर आल्याने या पुरातून जाताना वरणगाव ऑर्डनन्सचा कर्मचारी दीपक पाटील हे पाण्यात पडले मात्र याचवेळी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उड्या घेवून या कर्मचार्याचे प्राण वाचवले. वरणगाव फॅक्टरीतील कर्मचारी दीपक पाटील हे कर्तव्य संपल्यानंतर घराकडे जात असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकी लवकी नाल्यातून पुढे नेण्याच्या प्रयत्नात वाहन बंद पडले व पाण्याच्या प्रवाहात दीपकदेखील वाहू लागल्याने त्यांनी प्रसंगावधान दाखवून दीपक यांनी पोल पकडला. या घटनेची माहिती कळताच अग्निशमन विभागाचे शैलेश भालेराव, तौसीफअली हनपी, हेमंत झोपे, मनोज चौधरी व सुरक्षा विभागाचे दरबान पवार आदींनी घटनास्थळी धाव घेत दीपकसह दुचाकीला बाहेर काढले. दरम्यान, या पुलाची उंची कमी असून यामध्ये कचरा अडकल्याने पुलावर पाणी व चिखल असतो. या कारणाने येथे छोटेमोठे अपघात घड असून भुसावळहुन येणारे फुलगांवचे कर्मचारी याच रस्त्याने ये-जा करतात या पुलाची उंची वाढविण्याची मागणी होत आहे.