रोटावेटरमध्ये अडकल्याने डांभूर्णीतील तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू


Unfortunate death of a young driver from Dambhurni after being stuck in a rotavator यावल : यावल तालुक्यातील डांभूर्णी येथे शेतात रोटावेटर करीत असताना ड्रायव्हरच्या मागच्या साईडला तोल गेल्याने रोटाव्हेटरमध्ये तो अडकताच त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. ही धक्कादायक घटना मंगळवार, 14 मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. विजय जानकीराम कोळी बाविस्कर (35) असे मयताचे नाव आहे.

डांभूर्णी गावात शोककळा
विजय हा रोटावेटर करण्यासाठी शेतात गेला असता मंगळवार, 14 मे 24 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास मागील बाजूस रोटावेटरमध्ये अटकडल्याने त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे झाले. याबाबत केतन रेवा पालक यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल मराठे करीत आहेत. दरम्यान, मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मयत विजय कोळी यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ व वहिनी असा परिवार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !