भुसावळात शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरेंना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन


भुसावळ : हिंदुहृदयसम्राट सरसेनापती वंदनीय शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. कट्टर शिवसैनिक व शिवभोजन केंद्र संचालक उमाकांत (नमा) शर्मा यांच्यातर्फे गोरगरीब जनतेस अन्नदान व फराळ वाटप करण्यात आले तसेच थंडीपासून बचावासाठी कांबळ वाटप करण्यात आले. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे भुसावळ रेल्वे स्टेशनजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख अ‍ॅड.जगदीश कापडे, शिवसेना नगरसेवक मुकेश गुंजाळ, माजी नगरसेवक दीपक धांडे, अ‍ॅड.निर्मल दायमा, ज्येष्ठ शिवसैनिक अबरार शेख, माजी नगरसेवक नरेंद्र लोखंडे, शिव वाहतूक सेनेचे हेमंत खंबायत, शिवसेना विभागप्रमुख अरुण साळुंके, गोलु कापडे, राजेश ठाकुर, शाखाप्रमुख धीरज वाढोणकर, अरुण साळुंखे, मिलिंद कापडे, अशोक हिंगणे, हितेश टकले व पदाधिकारी उपस्थित होते.

यावल शहरात शिवसेना कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
यावल : शिवसेना कार्यालयांमध्ये शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त शिवसेना कार्यालयांमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलामध्ये शिवसेना कार्यालय असू या कार्यालयात मंगळवारी शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, तालुकाप्रमुख रवींद्र सोनवणे, शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, उपप्रमुख शरद कोळी, नगरसेवक दीपक बेहेडे, प्रसिध्दीप्रमुख संतोष वाघ, आदिवासी सेलप्रमुख हुसेन तडवी, प्रकाश वाघ, बाळु निंबाळकर, संतोष खर्चे, डिगंबर सावकारे, अनिल पाटील, पप्पू जोशी, किरण बारी, योगेश चौधरी, योगेश पाटील, अजझर खाटीक, सागर देेवांग, शहाजी भोसले, विजय पंडीत, मोहसिन खान, कडू पाटीलसह शिवसैनिक उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !