भुसावळातील नाहाटा चौफुली उड्डाणपुलाला छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे


नगरसेवक पिंटू ठाकूर यांच्यासह नागरीकांची प्रांताधिकार्‍यांकडे मागणी

भुसावळ : भुसावळात शहरातीतील नाहाटा चौफुलीजवळून जाणार्‍या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावी, अशी मागणी भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे नगरसेवक पिंटू (महेंद्रसिंग) ठाकूर यांच्यासह पदाधिकार्‍यांनी मंगळवारी निवेदनाद्वारे केली.

लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला निवेदन
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असून त्यांचे नाव उड्डाणपुलाला द्यावी व शहरवासीयांची मागणी पूर्ण करावी, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी तसेच खासदार रक्षा खडसे व आमदार संजय सावकारे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. यावेळी चंदू बडगे, राहुल वरणकार, शेखर पाटील, धीरज पाटील, चेतन सोनवणे, सतीश खंडाले, प्रदीप सपकाळे, प्रवीण परदेशी, सुरज वराडे, हर्षल कोळी, भूषण कोळी, संजू जगताप, बापू बाविस्कर, गोपाळ पाटील, अक्षय सोनवणे, हर्षल ठाकूर, अलंकेश लहरीर, नितीन मराठे, गजू सुर्यवंशी, निलेश ठाकूर, संजय ठाकूर, विकास राखोंडे, गोलू राखोंडे, गोकुळ पाटील, उमेश ठाकूर आदींची उपस्थिती होती.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !