भरधाव चारचाकीची दुचाकीला धडक : भुसावळच्या इसमाचा मृत्यू


यावल : भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडके भुसावळातील 72 वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू झाला तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. तालुक्यातील निमगावजवळ रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. ईसाक खान समशेर खान (72, रा. मौलाना आझाद नगर, कब्रस्तान रोड, भुसावळ) असे मृताचे नाव असून या अपघातात त्यांच्या पत्नी जुलेखाअंजुम इसाक खान (60) या जखमी झाल्या. यावल शहरात रविवारी एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी इसाक खान समशेर खान (72) व त्यांच्या पत्नी दुचाकीने आले होते. सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ते भुसावळकडे दुचाकी (एम.एच.19 ए.एफ.5094) निघाले असताना निमगाव गावाजवळ भुसावळकडून येणार्‍या चारचाकी (एम.एच.04 बी.एच.5827) ने खान यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात खान आणि त्यांच्या पत्नी जखमी झाल्या. दोघांना तातडीने भुसावळ येथील खाजगी दवाखान्यात नेण्यात आले असता उपचारादरम्यान ईसाक खान यांचा मृत्यू झाला. नाजीम खान यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मृत्यू झालेले इसाक खान हे यावल पोलिस ठाण्यातील सहा.फौजदार मुजफ्फर खान समशेर खान यांचे मोठे बंधू होत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !