रावेरात जय बजरंग उपहारगृह जळून खाक
रावेर : रावेर शहरात मध्यरात्री एकच्या सुमारास जय बजरंग उपहारगृह जळुन खाक झाले. रावेर शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकाला लागून असलेल्या जय बजरंग उपहारगृहाला बुधवारी रात्री एकच्या सुमारास शॉट सर्किटमुळे आग लागून जळुन खाक झाली. या आगीमुळे संपूर्ण रावेर शहराचा एक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. या आगीत कितीचे नुकसान झाले ? याची प्राथमिक माहिती मिळु शकली नाही. आगीनंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. रात्री रावेर नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक धोंडू वाणी यांनी घटनेची माहिती मिळताच पालिकेची अग्निशामन दलाची गाडी बोलावून आग आटोक्यात आणण्यात आली.

