वढोदा राखीव वनक्षेत्रात अवैध वृक्षतोड : दोघा आरोपींना अटक
भुसावळ : वढोदा वनक्षेत्रातील नियतक्षेत्र राजुरा कम्पार्टमेंट क्रमांक 565 मध्ये अज्ञात आरोपींनी अवैधरीत्या वृक्षतोड केली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुभाष भावसिंग पावरा (37) व नानाभा राजमल पावरा (36, दोन्ही पावरीवाडा, धुळे, ता.मुक्ताईनगर) यांना अटक करण्यात आली. उपवनसंरक्षक विवेक वि.होशिंग, वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र राणे, वढोदा वनपरीक्षेत्र अधिकारी आशुतोष बच्छाव, कुर्हा वनपाल भावना मराठे, चारठाणा वनपाल डिगंबर पाचपांडे, राजुरा वनरक्षक विजय अहिरे, वायला वनरक्षक डी.एस.पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली. कुर्हा वनपाल भावना मराठे तपास करीत असून आरोपींना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

