रावेरात उपमुख्य कार्यकारी अधिकार्यांनी घरकुल योजनेचा घेतला आढावा
रावेर : रावेर पंचायत समितीला बुधवारी जिल्हा परीषदेचे उपमुख्य अधिकारी गणेश चौधरी यांनी भेट दिली. त्यांनी घरकुल एमआरजीएस कामांचा आढावा घेऊन पंचायत समितीच्या नविन इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांच्या सोबत गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल देखिल उपस्थित होत्या.तालुक्यातील ालवाडी ग्राम पंचायतीच्या एन.ए.प्लॉट संदर्भाची विभागीय फेर-चौकशी असल्याने जिल्हा परीषदेचे उप मुख्याधिकारी गणेश चौधरी रावेर तालुक्यात आले होते. त्यांनी बलवाडी येथील चौकशी झाल्यानंतर रावेर पंचायत समितीला भेट देऊन विविध योजनांची माहिती जाणून घेतली व घरकुल एमआरजीएससह इतर योजनांचा कामाचा वेग वाढविण्याच्या सूचना केल्या. यावेळी विस्तार अधिकारी सोनवणे तसेच घरकुल एमआरजीएसचे कर्मचारी उपस्थित होते.

