भुसावळातील गोलाणी परीसरात विवाहितेची आत्महत्या
भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल तनारीका हॉटेल जवळील रहिवासी असलेल्या कल्पना दिपक पवार (40) यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना गरूवारी दुपारी 2.15 वाजता घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. विवाहितेने राहत्या घरात पंख्याच्या हुकाला साडी अडकवून गळफास घेतला. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात सुरेश कीसन इंगळे यांनी दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक मंगेश गोंटला, सहायक फौजदार माणीक सपकाळे, योगेश महाजन यांनी घटनास्थळी पंचनामा केला. विवाहितेच्या पश्चात पाच वर्षाचा मुलगा व साडे तीन वर्षाची मुलगी आहे.

