अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन
भुसावळ : रेल्वे स्थानकावरील पीआरएस कार्यालय ते दर्ग्याजवळ 16 रोजी 65 वर्षीय अनोळखी महिलेचा मृत्यू झाला. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नसल्याने ओळख पटवण्याचे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. उंची 4.7 फूट, रंग निमगोरा, केस पांढरे-काळे, शरीर बांधा सडपातळ, अंगात लाल रंगाचे ब्लाऊज, पिवळसर रंगाच्या फुलांची साडी, जांभळ्या रंगाचे स्वेटर बिनबाहीचे असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्गचे सहा.पोलिस उपनिरीक्षक बबन डी.शिंदे (7719048517) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लोहमार्ग पोलिसांनी केले आहे.

