पाणी, वीज, रस्ते हे शेतकर्यांचे तीन मूलभूत हक्क
आमदार चंद्रकांत पाटील : पाणंद शेतीरस्ते योजने अंतर्गत शेतीरस्त्यांची खडीकरण
खिर्डी : पाणी, वीज, रस्ते हे शेतकर्यांचा हक्क व मूलभूत अधिकार आहे. शेतकरी हे पूर्ण देशाचे अन्नदाता असून त्यांचे मूलभूत अधिकार हे त्यांना दिलेच पाहिजे तसेच मुक्ताईनगर मतदारसंघात शंभर टक्के शेती रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येतील, असे आश्वासन आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. मतदारसंघातील विटवा, निंबोल, ऐनपूर, कोळदा, रेंभोटे, खिर्डी बुद्रुक, निंभोरा, उदळी, तासखेडा, रणगाव, गहुखेडा, रायपूर, सुतगाव, थोरगव्हाण, गाते या गावांमध्ये लेखाशीर्ष पाणंद शेतीरस्ते योजने अंतर्गत शेतीरस्ते खडीकरण व भुमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी आमदार बोलत होते.
यांची होती उपस्थिती
आमदार पाटील यांनी खिर्डी येथे शव पेटी व स्वर्ग रथ लवकरच उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी भागवत सीताराम पाटील, युवराज महाजन, भास्कर रामू पाटील, जयंत सीताराम पाटील, भास्कर विठ्ठल पाटील, सुरेश पाटील, निळू पाटील, दिनेश (छोटू)पाटील, भागवत कोळी, तुळशीराम पाटील, चिंतामण कोळी, मोहन कोळी, सुनील महाजन, अमोल पाटील, युवराज पातळ, साबीर बेग, जाकीर पिंजारी, सुभाष महाजन, बाजीराव पाटील, रमेश पाटील, सोपान पाटील, भागवत महाजन, योगेश पाटील, साहेबराव पाटील, कांतीलाल गाढे, पंकज वाघ, राहुल गाढे, ईश्वर गाढे, मनू कोचुर, गोपाळ महाजन, योगेश पुंजाजी, राहुल कैलास, योगेश चौधरी, एकनाथ महाजन, दिलीप गाढे, सोहम सपकाळे, विनोद महाजन, वासुदेव महाजन आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

