जुन्या घराच्या खोदकामात सापडली चांदीची नाणी


गोजोर्‍यातील घटना : पोलिस व तहसील प्रशासनाच्या उपस्थितीत नाणी जप्त

भुसावळ : जुन्या घराचे खोदकाम सुरू असतान ब्रिटीशकालीन 17 चांदीची नाणी सापडल्याची घटना तालुक्यातील गोजोरे येथे गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या घडली मात्र गावात सोन्याची घागर सापडल्याची अफवा पसरल्याने ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. गोजोरा गावातील रहिवासी परशुराम ज्ञानदेव राणे यांच्या जुन्या घराची भिंत पाडण्याचे काम सुरू असताना मजुरांना खोदकामात ब्रिटिशकाळातील 1862, 1872, 1886 आणि 1901 या वर्षांचा उल्लेख असणारी 19 नाणी आढळून आली. गावातील पोलिस पाटलांनी भुसावळ तालुका पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक निरीक्षक अमोल पवार, नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी पंचनामा करून सर्व नाणी ताब्यात घेतली. पोलिस व महसूलचे अधिकारी पोहोचल्याने नाण्यांची सत्यता समोर आली तर राणे कुटुंबियांना घागर सापडल्याच्या अफवेमुळे चांगलाच मनस्ताप झाला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !