रेल्वे प्रवाशांना नवीन पाच गाड्यांचा दिलासा
रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय : आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच मिळणार प्रवेश
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी पाच विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, या गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
जयनगर-एलटीटी एक्स्प्रेस
अप 05547 जयनगर-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष उत्सव गाडी 23 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर रोजी प्रस्थान स्टेशनपासून दर सोमवारी सुटणार आहे. डाऊन 05548 लोकमान्य टिळक टर्मिनल- जयनगर विशेष उत्सव गाडी 26 नोव्हेंबर व 3 डिसेंबर रोजी प्रस्थान स्टेशनपासून प्रत्येक गुरुवारी सुटणार आहे.
रक्सोल-एलटीटी विशेष गाडी
अप 05267 रक्सौल-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष उत्सव गाडी 28 नोव्हेंबर रोजी प्रस्थान स्टेशनपासून शनिवारी सुटणार आहे. डाऊन 05268 लोकमान्य टिळक टर्मिनल-रक्सौल विशेष उत्सव गाडी 1 डिसेंबरपासून प्रस्थान स्थानकापासून मंगळवारी सुटणार आहे.
दरभंगा-अहमदाबाद विशेष गाडी
अप 05559 दरभंगा-अहमदाबाद विशेष उत्सव गाडीची एक फेरी 25 नोव्हेंबरपासून प्रस्थान स्टेशनपासून बुधवारी सुटणार आहे. अप 05560 अहमदाबाद-दरभंगा विशेष उत्सव गाडीची एक फेरी 27 नोव्हेंबर रोजी प्रस्थान स्टेशनपासून शुक्रवारी सुटणार आहे.
जय नगर-उधना विशेष एक्स्प्रेस
अप 05563 जयनगर-उधना विशेष उत्सव गाडी 27 नोव्हेंबर रोजी प्रस्थान स्टेशनपासून शुक्रवारी सुटणार आहे तर डाऊन 05564 उधना-जयनगर विशेष उत्सव गाडी 29 नोव्हेंबर रोजी प्रस्थान स्टेशनपासून शनिवारी सुटणार आहे. या गाड्यांमध्ये केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांंना प्रवेश दिला जाणार असून कोरोना नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे.
चेन्नई-अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस
अप 02656 चेन्नई-अहमदाबाद सुपरफास्ट विशेष गाडी 22 नोव्हेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज चालवण्यात येणार आहे. दररोज सकाळी 10.10 वाजता चेन्नई स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर दुसर्या दिवशी अहमदाबाद येथे सायंकाळी सहा वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापू, भुसावळ, जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02655 अहमदाबाद-चेन्नई सुपरफास्ट विशेष गाडी 23 नोव्हेंबरपासून पुढील आदेश येईपर्यंत दररोज चालवण्यात येणार आहे. ही गाडी दररोज रात्री 10 वाजता अहमदाबाद स्टेशनपासून सुटल्यानंतर तिसर्या दिवशी चेन्नई येथे पहाटे 4.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा आदी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला फर्स्ट एसी फर्स्ट कम टू टियर, फर्स्ट एसी 2 टियर, 5 एसी थ्री टीयर, 10 स्लीपर क्लास, दोन सर्वसाधारण सिटींग बोगी जोडण्यात येणार आहेत. आरक्षिति तिकीट असणार्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची/प्रवास करण्याची परवानगी असणार आहे तसेच कोरोना नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागणार आहे.

