सुधा खराटेद्वारा लिखीत अबोल झाली सतार कथासंग्रह प्रकाशीत


यावल : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुधा मधुकर खराटे द्वारा लिखीत ‘अबोल झाली सतार’ या कथासंग्रहाचे प्रकाशन नुकतेच त्यांच्या मातोश्री चंद्रभागाबाई सीताराम पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मारवड, ता.अमळनेर महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय महाजन होते. प्रमुख अतिथी म्हणून आशा पाटील व मंगला पाटील यांची विशेष उपस्थिती होती.

‘अबोल झाली सतार’ मध्ये भाव-भावनांचे दर्शन
याप्रसंगी डॉ.संजय महाजन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ‘अबोल झाली सतार’ या संग्रहातील कथांमध्ये मानवी जीवनातील विविध प्रसंग व घटनांचे वास्तववादी दर्शन घडते. भाव-भावनांचे सहज व स्वाभाविक चित्रण या कथासंग्रहाचे खास वैशिष्ट आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. यापूर्वी प्रा.डॉ.सुधा खराटे यांचा एक कथासंग्रह ‘नजराणा’ व ’अनोखी मैत्री’, ‘संध्याछाया’ आणि ‘मनवा’ हे तीन ललितगद्य संग्रहदेखील प्रकाशित झालेली आहेत. ‘नजराणा’ या कथासंग्रहासाठी त्यांना 2016 चा स्व. बाबासाहेब के.नारखेडे राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्रदान करून सन्मानीत करण्यात आले होते. त्यांच्या या यशाबद्दल प्राचार्य डॉ.संध्या सोनवणे, उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, प्रा.अर्जुन पाटील, प्रा.संजय पाटील, मुख्याध्यापिका निशा पाटील, योग शिक्षिका सुरेखा काटकर, डॉ.सुधीर कापडे, डॉ.प्रल्हाद पावरा, प्रा.मनोज पाटील व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंदामार्फत अभिनंदन करण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !