रावेर तालुक्यात तत्काळ कापूस खरेदी केंद्र सुरू करा


रावेर बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांचे उपमहाप्रबंधकांना निवेदन : लवकरच केंद्र सुरू करण्याची ग्वाही

रावेर : रावेर तालुक्यात कापुस खरेदी केंद्र सुरू करण्यासंर्भात शुक्रवारी बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांनी औरंगाबाद येथे भारत कपास निगम लिमिटेडचे उप महाप्रबंधक अर्जुन दवे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.जिल्ह्यात सर्वच ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू झाले परंतु रावेर तालुक्यात कापूर खरेदी केंद्र अद्यापही सुरू झालेली नाही. शेतकर्‍यांचा कापूस घरात पडून असून नोव्हेंबर महिना संपण्यात आला परंतु कापुस खरेदी केंद्र सुरू झाले नाही यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

बाजार समितीचे उपमहाप्रबंधकांना निवेदन
औरंगाबाद येथे भारतीय कपास निगम लिमिटेडचे उपमहाप्रबंधक अर्जुनजी दवे यांची शुक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, माजी सभापती राजीव पाटील, डॉ.राजेंद्र पाटील, नीळकंठ चौधरी, सचिव गोपाळ महाजन यांनी भेट घेऊन तालुक्यात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली.

ग्रेडरअभावी आहे खरेदी केंद्र बंद
मागील वर्षी कापूस खरेदी केंद्राला ग्रेडर मिळाला नव्हता अखेर बोदवडच्या ग्रेडरकडे रावेरच्या कापूस खरेदी करण्याची जबाबदारी होती. प्रभारीराजमुळे कापसू अपेक्षीत खरेदी न झाल्याने यंदा सीसीआयने रावेरला खरेदी केंद्र सुरू केले नाही. हेच केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी बाजार समिती पाठपुरावा करत आहे.

खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार
भारतीय कपास निगम लिमिटेडचे उपमहाप्रबंधक अर्जुनजी दवे यांची भेट घेतली असून त्यांनी रावेरला कापूस खरेदी केंद्र सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. त्यांना खासदार रक्षा खडसे व आमदार शिरीष चौधरी यांनीदेखील संपर्क साधून दवे यांच्याशी बोलणे झाले आहे. रावेर कापूस खरेदी केंद्र लवकरच सुरू होणार असल्याचे बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन यांनी ‘दैनिक जनशक्ती’शी बोलताना सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !