तरुण संगीतकार म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये खिर्डीच्या उत्कर्षचे नाव
खिर्डी (सादीक पिंजारी) : गावातील उत्कर्ष किरण नेमाडे यांनी 2002 मध्ये हंग्रीच्या अदम लोरीज याने रचलेला सर्वात तरुण संगीतकारचा (यंगेस्ट कंपोझर फोर म्युझीकल) विक्रम मोडून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. 15 नोव्हेंबर रोजी संगीत नाटक अकादमी आयोजित ऑनलाइन स्पधत हा विक्रम उत्कर्षने रचला. या आधी 2002 मध्ये हंग्री देशातील अदम लोरिंज याने हा विक्रम रचला होता. 92 मिनिटांच्या सरासरी नुसार उत्कर्षने हा विक्रम जळगांव जिल्ह्यात मोडत महाराष्ट्रातला पहिला वैयक्तिक सर्वात तरुण संगीतकार ठरला आहे.
ग्रामस्थांनी केला शुभेच्छांचा वर्षाव
उत्कर्षला या आधी 2018 मध्ये सर्वोत्कृष्ट तबला वादक बालकलाकार म्हणून ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. अकादमी ऑफ मोशन पिक्चर्स ऑफ आर्ट अ सायन्स तर्फे संगीत नाटक अकादमीमध्ये मान मिळाला होता. उत्कर्ष हा खिर्डी येथील शेतकरी किरण प्रकाश नेमाडे व ग्रामपंचायत सदस्या मोहिनी नेमाडे यांचा मुलगा आहे. तो फैजपूर येथील सतपंथ कला केंद्रामध्ये संगीताचे शिक्षण घेत आहे. त्याच्या यशाबद्दल महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरीजी महाराज, संगीत शिक्षक उत्पल सर तसेच सर्व गावकर्यांनी उत्कर्षवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
तरुणाईने संगीताकडे वळावे
लहानपणापासूनच संगीताची आवड असल्यामुळे आई-वडील तसेच माझे गुरु यांच्या मार्गदर्शनामुळे मला संगीत क्षेत्रात गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये मान मिळाला. तरुणाईने संगीताकडे वळून देशाचा नावलौकीक वाढवावा, असे उत्कर्ष नेमाडेने सांगितले.

