वधू-वर सूचीसाठी सकल लेवा पाटीदार समाजाला आवाहन


भुसावळ : अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ, भोरगाव लेवा पाटीदार पंचायत विभाग, भुसावळ व लेवा पाटीदार मित्र मंडळ, औरंगाबादतर्फे समाजातील विवाहेच्छूक वधु-वर सूची 2020 करीता समाजातील विवाहेच्छूकांनी शैक्षणिक, कौटुंबिक, व्यावसायिक माहितीचे संकलन असलेली पुस्तिका तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत आहे. वधू-वर सूची अर्ज लेवा पाटीदार पतसंस्था, निसर्ग प्लाझा, जामनेर रोड, भुसावळ तसेच भोरगाव लेवा पंचायत विभाग, हॉटेल मल्हार शेजारी, भुसावळ येथे समाज बांधवांना येथे मिळणार असल्याचे शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, पंचायत सचिव डॉ.बाळू पाटील व मधुकर सरोदे यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी मोबाईल 9373400011, 9860791180, 9404533255, 9823085233,8007053895, 9890379020, 9823214150 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !