निंभोरा पोलिसांनी महामार्गावरील झुडूपे हटवली


खिर्डी : येथून जवळच असलेल्या विवरा येथे निंभोरा पोलिस व विवरा येथील पोलिस पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने महामार्गावरील झुडूपे हटवण्यात आली. रस्त्यावरील झुडूपे अपघाताला आमंत्रण देणारी ठरत असल्याने पोलिसांनी दखल घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. निंभोरा पोलिस ठाण्याचे सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा सहा.फौजदार रा.का.पाटील व विकास कोल्हे तसेच विवरा गावचे पोलिस पाटील पंकज बेंडाळे यांनी सावदा ते रावेर रोडवरील विवरा खुर्द व विवरा बु.॥ गावाजवळील वळण रस्त्याला लागुन असलेली झुडूपे पोलिस ठाण्याच्या वतीने हटवण्यात आली. गावाजवळील वळण व धोकादायक रस्त्यावर असलेली तसेच अपघात प्रवणग्रस्त ठिकाणची झुडूपे ग्रामपंचायतीकडून हटवण्याचे आवाहन निंभोरा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !