यावल व रावेर तालुक्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू होणार


खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश : शेतकर्‍यांना दिलासा

भुसावळ : यावलसह रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांना तालुक्यामध्ये स्वतंत्र कापूस खरेदी केंद्र नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती. याबाबतीत शेतकर्‍यांनी खासदार रक्षा खडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. खासदार रक्षा खडसे यांनी सीसीआयचे डेप्युटी जनरल मॅनेजर अर्जुन दवे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून यावल व रावेर तालुक्यात सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत सूचना दिल्या तसेच ईमेल केला. खासदार खडसे यांच्या प्रयत्नाला यश आले असून सीसीआयने यावल व रावेर तालुक्यात आठवड्यातून एक दिवस प्रातिनिधिक स्वरूपात कापूस खरेदी सुरू करू, कापूस खरेदीला शेतकर्‍यांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढील वर्षी पूर्ण वेळ कापूस खरेदी केंद्र सुरू ठेवू या आशयाचा इमेल पाठवल्याचे खडसे यांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !