तिकीट निरीक्षकांची सतर्कता : विवाहिता पोहोचली पतीकडे


पतीशी भांडणानंतर सोडले होते विवाहितेने घर : लोहमार्ग पोलिसांच्या उपस्थितीत महिलेला दिले पतीच्या ताब्यात

भुसावळ : पतीशी कौटुंबिक वादातून पत्नीने घर सोडले गांधी एक्स्प्रेसने मुंबई जाण्यासाठी प्रवास सुरू करीत भुसावळ गाठले मात्र आरक्षित गाड्या सुरू असल्याने तिकीट निरीक्षकांनी भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकीटाची विचारणा केल्यानंतर महिलेजवळ तिकीट नसल्याची बाब समोर आल्यानंतर या संदर्भात या महिलेला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी सुरतमध्ये राहणार्‍या विवाहितेच्या पतीशी संपर्क साधून घडल्या बाबीची माहिती दिली व विवाहितेचा पती भुसावळ आल्यानंतर लोहमार्ग पोलिसांच्या उपस्थितीत विवाहितेला पतीच्या ताब्यात देण्यात आले. तिकीट निरीक्षकांनी दाखवलेल्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.

तिकीट निरीक्षकांच्या सतर्कतेचे कौतुक
मुळची उत्तर प्रदेशातील रहिवासी आणि हल्ली सुरतमध्ये वास्तव्यास असलेली विवाहिता खूशबू योगेशसिंह राजपूत (20) हिचा पतीशी वाद झाल्याने संतापात घरातून बाहेर पडली, सुरत येथून मुंबई येथे जाण्यासाठी गांधी धाम एक्स्प्रेसमध्ये बसली आणि गुरूवारी दुपारी तीन वाजेच्या भुसावळात आली. गाडीतून उतरल्यावर टिसीने तिकीट विचारल्यावर तिकीट नसल्याने महिलेची चौकशी केली असता महिला पतीशी भांडून घरातून बाहेर पडल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारी महिलेचा पती भुसावळात आल्यावर जीआरपी पोलिसांनी महिलेस पतीच्या ताब्यात दिले.

कुठली गाडी कळालीच नाही
खुशबू ही विवाहिता संतापात घरून निघाली ती मुंबईला जाण्यासाठी मात्र रेल्वे स्थानकावर त्या आल्यानंतर त्यावेळी गांधी धाम एक्स्प्रेस स्टेशनवर उभी होती, त्याच गाडीत विवाहिता बसली मात्र मुंबई येत नसल्याने अन्य प्रवाशांनी भुसावळ आल्याची माहिती दिली. त्यामुळे ही महिला ही भुसावळ जंक्शनवर उतरली आणि टिसींच्या चौकशीत संतापात घरून निघून आल्याची माहिती समोर आली.

तिकीट नसतांना गाडीत बसलीच कशी ?
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सद्या विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहे. त्यात फक्त आरक्षण तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवेश दिला जात असतो. मात्र सूरत येथून ही महिला आरक्षण तिकीट तर सोडाच मात्र साधे तिकीट नसतांना सुध्दा कशी स्थानकावर येऊन गाडीत बसली याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !