जन्माला आलोय तर इतरांच्या कामास या, इतरांना मदत करा
प्रा.व.पु.होले : सावद्यात माजी विद्यार्थी मेळाव्यात प्रतिपादन
सावदा : आपले व्यक्तिमत्त्व कसे असावे, आपण कसे वागले पाहिजे आणि सर्वात महत्वाचे जन्माला आलोय तर इतरांच्या कामास या इतरांना मदत करा, असे आवाहन प्रा.व.पु.होले यांनी येथे व्यक्त केले. श्री.आ.गं.हायस्कुल व श्री.ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहभेटी मेळावा नुकताच नगरपालिकेच्या बहुउद्देशीय सभागृहात झाला. अध्यक्षस्थानी प्रा.व.पु.होले होते. यावेळी प्राचार्य सी.सी.सपकाळे, शिक्षक एस.वाय.सरोदे, ए.एम.वाणी, एस.एम.महाजनआणि नंदू पाटील हे शिक्षक उपस्थित होते.
बारावीच्या विद्यार्थ्यांकडून आयोजन
2006 वर्षात शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिवाळीची सुटी आणि कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात सर्व जण आपल्या गावाकडे घरीच होते. हे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी एकमेकांना संपर्क साधून या कार्यक्रमाची एक रूपरेषा तयार केली आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन काही वेळ आपल्या सहकार्यांसोबत घालवण्याचे नियोजन केले. सुरुवातीला सेवानिवृत्त शिक्षक पी.डी.वारके यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिक्षकांचाही झाला गौरव
प्रास्ताविक नंदू पाटील यांनी केले. याप्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी आपला परीचय करून आपण सध्या काय करतो, आपल्या कामाचे स्वरूप आणि आपले कार्यक्षेत्र व त्याचबरोबर शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात. एकाच छताखाली, एकाच शाळेतील इतक्या विविध क्षेत्रातील काम करणारे विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेर्यावरील आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते. सी.सी.सपकाळे, एस.एम.महाजन, नंदू पाटील यांनीही आपली मनोगते व्यक्त केले.
आभार लोकेश टोके यांनी मानले.
यांनी घेतले परीश्रम
स्नेह मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी लोकेश टोके, स्वप्नील चौधरी, पंकज पाटील, बंटी जंगले, अमित पाटील, विशाल पाटील, राहुल बेंडाळे, महेंद्र नेमाडे, किरण लोमटे, राहुल धांडे, भरत येवले, रुपेश जैन आदींनी परीश्रम घेतले.

