रावेर तालुक्यात गोडावूनअभावी ज्वारी-मका खरेदीला ‘ब्रेक’
18 दिवसांपासून शेतकर्यांना ज्वारीसह मका खरेदीची प्रतीक्षा : खरेदी-विक्री संघ मॅनेजरांच्या माहितीनुसार गोदामाअभावी रखडली खरेदी : तहसीलदारांच्या माहितीनुसार याद्यांअभावी रखडली खरेदी
रावेर : तालुक्यातील एक हजार 125 शेतकर्यांनी ज्वारी व मका राज्य शासनाला विक्रीसाठी 3 नोंव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी केली असलीतरी 18 दिवस उलटूनदेखील भरड धान्य ठेवण्यासाठी गोडावूनच उपलब्ध करून न दिल्याने शेतकर्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. तहसीलदारांच्या माहितीनुसार गोडावून उपलब्ध आहे परंतु शेतकर्यांच्या याद्या दिल्या नसल्याने खरेदी प्रलंबित आहेत तर संघाचे मॅनेजर यांच्या म्हणण्यानुसार गेल्या 18 दिवसांपासून आम्ही गोडावूनच्या प्रतीक्षेत आहोत. यासाठी पत्रव्यवहार सुध्दा झाला आहे परंतु याद्या महसुलने दोन दिवसांपूवी असून त्यादेखील तात्काळ दिल्या आहे. निव्वळ निष्काळजीपणामुळे शेतकर्यांची खरेदी रखडल्याने संताप व्यक्त होत आहे.
शेतकर्यांचा झाला अपेक्षाभंग
निंबोल, ता.रावेर येथील मका उत्पादक शेतकरी राजेंद्र पाटील यांच्या माहितीनुसार, दिवाळी तोंडावर असल्याने अनेक शेतकर्यांनी पहाटे तीन वाजेपासून खरेदी-विक्री संघात ज्वारी व मका विक्रीसाठी नंबर लावले होते परंतु दिवाळी होऊन आठ दिवस उलटले परंतु आज आमचा एक दाना सुध्दा गोडाऊनअभावी मोजला गेलेला नाही. यात सर्व निष्काळजीपणा सुरू असून आमच्या प्रचंड अपेक्षाभंग झाल्या आहेत.
*गोडावूनअभावी खरेदी केंद्र बंद : मॅनेजर
रावेर खरेदी-विक्री संघाचे मॅनेजर विनोद चौधरी यांच्या माहितीनुसार, आमच्याकडून महसूल प्रशासनाला 3 नोंव्हेंबरलाच धान्य ठेवण्यासाठी गोडावून उपलब्ध करून देण्याबाबत पत्रव्यवहार केला परंतु कालच आम्हाला तहसीलदारांकडून शेतकर्यांच्या याद्या मागविल्या होत्या. त्या याद्या आम्ही त्यांना तत्काळ दिल्या आहे. खरेदी-विक्री संघ शेतकर्यांचे धान्य खरेदी करण्यासाठी तयार आहे. आज 18 दिवस उलटले परंतु आम्हाला गोडाऊन उपलब्ध न झाल्याने तालुक्यातील शेतकर्यांची मका व ज्वारी खरेदी रखडली आहे.
1125 शेतकर्यांची ऑनलाईन नोंदणी
राज्य शासनाला ज्वारी व मका विक्रीसाठी रावेर तालुक्यातील एक हजार 125 शेतकर्यांनी पहाटे तीन वाजता रांगेत उभे राहून ऑनलाइन नोंदणी केली आहे. शासनाने ज्वारीला दोन हजार 620 तर मक्याला एक हजार 850 रुपये भाव निश्चित केला आहेत.
शेतकर्यांची नावे प्राप्त होताच गोडावून देणार : तहसीलदार
महसूल प्रशासनाकडे शेतकर्यांच्या नावांची यादी न मिळाल्याने उपलब्ध असलेले गोडावून खरेदी-विक्री संघाला दिले नाही यामुळे शेतकर्यांची दिवाळी अंधारात गेली तर तहसीलदार म्हणतात, आमच्याकडे गोडावून उपलब्ध आहे. संघाने किती शेतकर्यांचे ऑनलाइन नाव नोंदले आहेत, त्यांचे नाव आधार कार्ड आणि बँक पासबुक झेरॉक्सच्या याद्या खरेदी-विक्री संघाकडून मागविल्या आहेत. याद्या प्राप्त होताच त्यांना गोदाम जाईल, असे तहसीलदार उषाराणी देवगुणे म्हणाल्या.

