शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारू अड्ड्यावर कारवाई
भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळा गावाच्या नाल्याजवळ गावठी दारूची हातभट्टी चालवणार्या जुम्मा पिरू गवळी (रा.कन्हाळा) यास तालुका पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या ताब्यातून गूळ मोह नवसागर मिश्रित द्रव्य कच्चे रसायनाचे चार ड्रममधल आठशे लिटर रसायण व गावठी हातभट्टीची 30 लिटर तयार दारू मिळून 28 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जपत करण्यात आला. ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहा.निरीक्षक अमोल पवार, हवालदार विठ्ठल फुसे, युनूस इब्राहिम, शेख रीयाज काझी, विनोद पाटील, पंकज सपकाळे, युसूफ शेख, पोलिस पाटील रेवसिंग पाटील यांनी केली.

