भुसावळात वयाची शंभरी गाठलेल्या रेल्वे कर्मचार्याचा गौरव
भुसावळ : रेल्वेत गार्ड पदावर नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या व वयाची शंभर पार केलेल्या सेवानिवृत्ती वेतनधारक केशव नरहर बापट यांचा मंडळ रेलवे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांच्याद्वारे प्रशस्तीतपत्र, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. केशव नरहर बापट हे रेल्वेत गार्ड या पदावर कार्यरत होते. 1978 रोजी रेल्वेतून ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपल्या वयाची 100 वर्ष 21 नोव्हेंबर 2020 रोजी पूर्ण केल्यानें शंभर टक्के पेन्शनमध्ये वाढ करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.

