वड्रीच्या अल्पवयीन तरुणीला पळवले : दोघांना अटक


यावल : अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी दोघांच्या यावल पोलिसांनी मुसक्या आवळल्या. तालुक्यातील वड्री येथून एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 18 नोव्हेंबर रोजी फूस लावून पळविल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या तपासात यावल पोलिसांनी साहिल उर्फ दादू संजय भालेराव याने स्वयंदीप उर्फ नवल भालेराव याच्या मदतीने पळवून नेले होते. शुक्रवारी या दोघा आरोपींसह अल्पवयीन मुलीलाही यावल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगाव येथे अल्पवयीन मुलीला आरोग्य तपासणीसाठी रवाना करण्यात आले. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !