आडगावात 55 वर्षीय इसमाची आत्महत्या


यावल : तालुक्यातील आडगाव गावातील रामचंद्र उर्फ देवसिंग मंगल भिलाला (55) यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण समोर आलेले नाही. या प्रकरणी घेसराम दवेसिंग बारेला (रा.आडगाव) यांनी यावल पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आडगाव येथील रहिवासी रामचंद्र उर्फ देवसिंग मंगल भिलाला हे शुक्रवारी रात्री त्यांच्या राहत्या घरात झोपले असता सकाळी सहा वाजेला त्यांना उठवण्यास गेल्यानंतर त्यांनी घरातच गळफास घेतल्याचे आढळले. तपास सहाय्यक फौजदार अजीज शेख करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !