लग्नाच्या पाच दिवसानंतर नववधूने दागिन्यांसह ठोकली धूम
यावलच्या तरुणाची फसवणूक : तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा
यावल : लग्नाच्या पाच दिवसानंतर नववधूने दागिन्यांसह पलायन केल्याप्रकरणी मध्यस्थासह तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावलमधील रहिवासी डिगंबर देविदास फेगडे (30, रा.महाजन गल्ली यावल) यांच्या तक्रारीनुसार, अकलुद, ता.यावल येथील साहेबराव कोळी व अनिल परदेशी यांनी व बहिणाबाई रावसाहेब अंबुरेरा (रा.दर्गा रोड, परभणी) यांनी जालना येथील राहणार्या एका गरीब कुटुंबातील तरूणीशी विवाह लावुन देण्याच्या नावाखाली आपली फसवणूक केली. 7 नोव्हेंबर रोजी यावल येथील विठ्ठल मंदिरात हिंदू रीतीरीवाजाप्रमाणे डिगंबर फेगडे यांनी जालनास्थित तरुणी सोनाली कुर्हाडे हिच्याशी विवाह केला तर 12 नोव्हेंबर रोजी वडील कामाला गेले तर आपण दुपारी एक वाजता कामासाठी गावात गेल्याने घरात एकटी असलेली पत्नी सोनाली कुर्हाडे हिने घराचा दरवाजा बंद करून चाबी शेजार्यांना देत मंदिरात जात असल्याचे सांगितले. नववधूने
अंगावरील 25 हजार रुपये किंमतीचे दागिने व पाच हजार रुपये किंमतीच्या साड्या व मोबाईल घेवून घर सोडले. पत्नी उशीरापर्यंत न आल्याने अखेर लग्न लावणार्या साहेबराव कोळी यांच्याशी संपर्क साधला असता कोळी यांनी आपण तुझे लग्न लावुन दिले आहे, सोनाली व बहिणाबाई यांना आपण ओळखत नसल्याचे सांगून त्यांनी आपली लग्नाच्या नावाखाली एक लाख रुपयात फसवणूक झाल्याचा दावा आपल्या फिर्यादीत केला आहे.

