रावेरात महिलेची गळफास घेऊन आत्महत्या
रावेर : शहरात एका 42 वर्षीय महिलेने गळफास लावुन आत्महत्या केल्याची घटना मध्यरात्री घडली. या बाबत वृत्त असे की रावेर शहरात पंचमुखी हनुमान नगरमधील रहिवासी असलेले भारती दिनेश चौधरी हिने राहत्या घरात सूतळीच्या साहाय्याने गळफास लावुन आत्महत्या केली. सकाळी बचत गटाचे सहकारी घरी आले तेव्हा मयत भारती चौधरी गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. रावेर पोलिस स्टेशन अकास्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

