मुक्ताईनगरात खासदारांच्या उपस्थितीत वीज बिलांची होळी
मुक्ताईनगर : लॉकडाउनच्या काळात राज्यातील नागरीकांना भरमसाठ वीज बिले आली. जनआक्रोश निर्माण झाल्यावर सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी जाहीर केले पण आता ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिलाबाबत दिलासा मिळणार नसल्याचे जाहीर केले. नागरीकांकडून ही सक्तीची वसुली असून राज्यातील जनतेची ही फसवणूक असल्याने भाजपतर्फे मुक्ताईनगरात आंदोलन करण्यात आले. यावेळी वीजबिलाची होळी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
खासदार रक्षा खडसे, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, माजी जि.प.अध्यक्ष अशोक कांडेलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. महावितरणकडून बिल वसुली सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला असून या सरकारला सतेच्या धुंदीतून जागे करून जनतेला वीजबिलात सवलत देण्यासाठी भाग पाडणार असल्याचे भाजपकडून यावेळी सांगण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष नजमा तडवी, पं.स.उपसभापती विद्या पाटील, पं.स. सदस्य राजेंद्र सावळे, पं.स. सदस्य शुभांगी भोलाने, भाजयुमो विधानसभा क्षेत्रप्रमुख दत्ता पाटील, भाजयुमो तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी, नगरसेवक ललित महाजन, नगरसेवक पियुष महाजन, नगरसेवक मुकेश वानखेडे, नगरसेवक संतोष कोळी, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाने, रीपाई (आ) तालुकाध्यक्ष विक्रम हिरोळे, विनोद पाटील गुणवंत पिवटे, प्रभाकर महाजन निखिल महाजन साहेबराव पाटील शकील खा करीम खा व कार्यकर्ते उपस्थित होते.

