रावेरात अखेर भरड धान्य खरेदीला सुरूवात


आमदार शिरीष चौधरींच्या उपस्थितीत धान्य खरेदीला सुरूवात

रावेर : अखेर भरड धान्य खरेदीला दिवाळीनंतर मुहूर्त मिळाल्यानंतर मंगळवारी प्रत्यक्षात आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते धान्य खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे देखील उपस्थित होते.

आमदारांच्या हस्ते शेतकर्‍यांचा सत्कार
महसूल प्रशासनाने घेतलेल्या मंगल कार्यालयात दोन शेतकर्‍यांचा आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, बाजार समिती संचालक पितांबर पाटील, राजीव पाटील, गोंडू महाजन, डॉ.राजेंद्र पाटील, नीळकंठ चौधरी, बाजार समिती सचिव गोपाळ महाजन, खरेदी-विक्री चेअरमन पी.आर.पाटील, व्हा.चेअरमन किशोर पाटील, एस.आर.चौधरी, यादवराव पाटील, जिजाबराव पाटील, सोपान पाटील, तुकाराम बोरोले, आर.के.चौधरी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमूद शेख, खरेदी-विक्री संघ मॅनेजर विनोद चौधरी, ग्रेडर प्रशांत पाटील, डॉ.सुरेश पाटील, पुरवठा अधिकारी हर्षल पाटील आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !