भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक : भुसावळातील महिलेचा मृत्यू


बोदवड : भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला तर महिलेचा मुलगा जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 वाजता शेलवडजवळ घडली. मालतीबाई सुधाकर चौधरी (भुसावळ) असे मयत महिलेचे नाव आहे. शिंदी-सुरवाडा या मधल्या मार्गाने नातेवाईक मरत पावल्याने द्वारदर्शनासाठी मालतीबाई सुधाकर चौधरी (भुसावळ) या आपला मुलगा सुनील सुधाकर चौधरी (39) सह दुचाकी (एम.एच.19-0256) ने येत असताना शेलवड गावालगत भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली (नंबर माहीत नाही) शेलवड ते भुसावळ चौफुल्लीवर दुचाकीला जोरदार धडक दिल्याने मालतीबाई चौधरी या जागीच ठार झाल्या व त्यांचा मुलगा तथा तक्रारदार सुनील सुधाकर चौधरी जखमी झाला. बोदवड पोलिस स्थानकात अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !