भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये नॉन कोविड सेवा सुरू


डॉ.देवर्षी घोषाल यांचा अतिरीक्त पदभार काढला

भुसावळ : शहरातील ट्रामा सेंटरचा अतिरीक्त पदभार डॉ.देवर्षी घोषाल यांच्याकडून काढण्यात आला असून ट्रामा केअर सेंटरमधील कोरोना तपासणी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आली असून तेथे नॉन कोविड सेवा सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी ट्रामा सेंटरला भेट देवून पाहणी केली.

डॉ.नि.तु.पाटील यांची तक्रार
ट्रामा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये केवळ आरटीपीसीआर चाचणी घेतल्या जातात. केवळ या चाचणीसाठी ट्रामा सेंटरची इमारत अडकवून ठेवण्यात आल्याने भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी तक्रार केली होती शिवाय या मागणीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनी 11 नोव्हेंबर रोजी आदेश देत ट्रामा सेंटर नॉन कोविड रुग्णांसाठी वापरण्याचे निर्देश दिले होते मात्र स्थानिक मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ.देवर्षी घोषाल यांनी याबाबत आदेश पाळले नाहीत. 11 दिवस उलटूनही ट्रामा सेंटरमध्ये नॉन कोविड सुविधा सुरु झालेली नाही. अद्यापही या ठिकाणी केवळ स्वॅब घेतले जात आहेत. या प्रकरणी पुन्हा डॉ. पाटील यांनी पाठपुरावा केल्याने सोमवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी भेट देवून पाहणी केली. दरम्यान यात त्यांनी नॉन कोविड सेवा तत्काळ सुरु करावी, असे निर्देश दिले. तसेच डॉ. देवर्षी घोषाल यांच्याकडे असलेल्या अतिरिक्त पदाचा कारभार काढून डॉ. मयुर नितीन चौधरी यांच्याकडे तो सोपवला आहे.

सततच्या पाठपुराव्याला यश : डॉ.पाटील
ट्रामा केअर सेंटरमध्ये नॉन कोविड रुग्णांसाठी सेवा सुरू करण्यासंदर्भात वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यांनतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी येथील पूर्ण तपासणी बंद करण्याचे आदेश देवूनही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे पुन्हा तक्रार केल्यानंतर डॉ. देवर्षी घोषाल यांच्याकडील पदभारही काढण्यात आला असून आता नॉन कोविड रुग्णांनाही ट्रामा केअरमध्ये चांगल्या सुविधा मिळतील, असा विश्वास डॉ.नी.तू.पाटील यांनी व्यक्त केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !