सातपुड्यातील दुर्लक्षित पाड्यांवर जागर प्रतिष्ठानकडून फराळाचे वाटप


सलग सहाव्या वर्षी माणुसकीचा जागर करीत सातत्य कायम

भुसावळ : शहरातील जागर प्रतिष्ठानने सालाबादाप्रमाने यंदाही आपली दिवाळी आदिवासी व दुर्लक्षित पाड्यांवर साजरी केली. यावेळी यावल अभयारण्य परीक्षेत्रातील पाल परीसरातील ठिकठिकाणी असलेल्या वाड्या-वस्तीत प्रत्यक्ष घरोघर जाऊन दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

फराळासह लाडू, मिठाईचे वाटप
जागर प्रतिष्ठान 2014 पासून दिवाळी सन आदिवासी भागात फराळ व वस्त्रदान करून साजरा करीत आहे. आज अनेक सामाजिक संस्था याच सेवाभावी वृत्तीने कार्य करीत असल्याने जागर प्रतिष्ठानने रुजविलेल्या रोपट्याचे विशाल वटवृक्षात रूपांतर होवू पाहत आहे. जागरने यंदाही दुर्लक्षित असलेल्या सातपुड्यातील पहाडी भागात असलेल्या पाड्यांवर जात दिवाळीचा आनंद आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविले. लोकसहभागातून जमविलेले 50 किलो फराळ, मोतीचूर लाडू, मिठाई व कपड्यांचे वाटप करण्यात आले. प्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.पंकज पाटील, उपाध्यक्ष श्रीराम सपकाळे, कोषाध्यक्ष हृषिकेश पवार, सचिव प्रा.निलेश गुरूचल, कायदेतज्ज्ञ अ‍ॅड.हरेश पाटील, संचालक पवन पाटील, गोकुळ सोनवणे, जागर मित्र अमोल पाटील, तुषार फालक, दीपक राजपूत, नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !