वरणगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची 27 रोजी आढावा बैठक


भुसावळ : वरणगाव शहर व भुसावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांची शुक्रवार, 27 रोजी दुपारी चार वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी होणार्‍या नगरपरीषद निवडणूक व सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत चर्चा केली जाणार आहे.

यांची राहणार उपस्थिती
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र भैय्या पाटील असतील. या बैठकीत माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे, भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, युवक जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष अरविंद मनकरी, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. या बैठकीला तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन भुसावळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे, अल्पसंख्यांक विभागाचे पप्पू जकातदार, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष मनोज कोलते यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !