नाव नोंदणी न करता 40 क्विंटलच्या आत कापूस विक्रीसाठी आणावा
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकर्यांना आवाहन
भुसावळ : नाव नोंदणी न करता 40 क्विंटलच्या आत शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी आणावा, असे आवाहन भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे. आतापर्यंत दोन्ही केंद्रांवर दहा हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सीसीआयच्या माध्यमातून तालुक्यातील कुर्हा येथील सौरभ ट्रेडींग कंपनी येथे आठवड्यातून गुरुवार व शुक्रवारी दोन दिवस तर शिंदी येथील मुक्ताई जिनींगमध्ये शनिवारी असे तीन दिवस कापूस मोजणी होणार असल्याचे बाजार समितीचे सचिव नितीन पाटील म्हणाले. दरम्यान कुर्ह्यात गुरुवार आणि शुक्रवार तसेच शिंदीत शनिवार या दिवशीच कापूस मोजणी होणार आहे. कापूस विक्रीसाठी येताना शेतकर्यांनी कोविड संदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पाटील यांनी केले आहे.

