कल्याणमधील पत्री पुलावर ब्लॉक : पाच गाड्या उशिराने धावणार
भुसावळ : कल्याण येथील पत्री पुलावर गर्डर टाकण्यात आल्यानंतर पुलाशी संबंधित इतर कामासाठी मध्य रेल्वे मुंबई विभाग ट्रॅफीक व पॉवर ब्लॉक शनिवार व रविवारी (28 व 29 नोव्हेंबर रोजी) मध्यरात्री दोन ते पहाटे पाच दरम्यान घेण्यात येणार आहे. या दरम्यान, अप मार्गावर धावणार्या पाच गाड्या नियमित वेळेपेक्षा उशिराने धावणार असल्याने रेल्वे प्रवाशांनी होणार्या गैरसोयीची दखल घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अप मार्गावर पाच गाड्या उशिराने धावणार
शनिवारी व रविवारी मध्यरात्री दोन ते पहाटे दरम्यान घेण्यात येणार्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे अप 01062 अप दरभंगा-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी टिटवाळा येथे थांबवण्यता येईल तर अप 02541 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडी खडवली येथे थांबवण्यात येणार आहे. अप 01016 गोरखपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी वाशिंद येथे तर अप 02810 हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष गाडी आटगाव येथे तसेच अप 01142 किनवट-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष सीएसएमटी गाडी खर्डी येथे थांबवण्यात येणार आहे. प्रवाशांना या कालावधीत होणार्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त करीत ब्लॉकबाबत दखल घेण्याचे आवाहन केले आहे. ं

