भारतीय संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


भुसावळ विभागात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन : संविधान प्रास्ताविकाचे सामूहिक वाचन

भुसावळ : भुसावळ शहर व विभागात भारतीय संविधान दिनानिमित्त गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. भुसावळ शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले तसेच ठिकठिकाणी संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

कामगार व विविध 10 संघटनातर्फे संविधान दिवस साजरा
दीपनगर : भारतीय संविधान बचाव सेना व राष्ट्रीय मजदूर सेनोतर्फे गुरुवारी कामगारवर्गाला मिठाई वाटप करण्यात आली तसेच संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कामगार नेते जगन सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सुरक्षा अधिकारी कदम, राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, सुनील ठाकुर, चंदू पहेलवान व असंख्य कामगार उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील ठाकुर तर आभार गजानन चर्‍हाटे यांनी मानले.

भुसावळ काँग्रेस अनु.जाती विभाग
भुसावळ : काँग्रेस अनु.जाती विभागाद्वारे संविधान दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व भारतीय संविधानातील प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यक्रमाचे समन्वयक योगेंद्र पाटील, जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटी अनु.जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक नरवाडे, जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी, काँग्रेस अनु.जाती विभागाचे उपाध्यक्ष विजय तुरकेले, ईस्माईल गवळी, महेबूब खान, गफुर गवळी, काँग्रेस अनु.जाती विभागाचे शहराध्यक्ष सुनील जोहरे, उपाध्यक्ष विनोद पवार, कुणाल सुरळकर, विक्रम वानखेडे, छोटू सपकाळे, मुकेश पगारे उपस्थित होते.

मंडल रेल प्रबंधक कार्यालय, भुसावळ
भुसावळ : मध्य रेल्वे मंडल रेल प्रबंधक कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. प्रास्ताविक वरीष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुडे यांनी केले. या प्रसंगी मंडल रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले. अपर मंडल रेल प्रबंधक मनोज कुमार सिन्हा, वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुडे, वरीष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, अन्य अधिकारी व कर्मचारी मोठ्या संखेत उपस्थित होते.

रावेर शहरातील विविध कार्यालय
रावेर : भारतीय संविधानामध्ये सर्व घटकांना सन्मानाने जीवन जगण्याचे अधिकार आहे. सर्वांसाठी समानता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली असल्याने सर्वांनी संविधान दिन संविधान प्रास्ताविकेचे वाचन करून साजरे करण्याचे अवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले. निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे कृषी उपन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम झाला. यावेळी तहसीलदार उशाराणी बोलत होत्या. यावेळी निळे निशाण सामाजिक संघटनेतर्फे बोलावलेल्या प्रवक्ते दीपक गाढे, गौतम साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी निळे निशाण सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर, पोलिस उपनिरीक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव, विजय गाढे, महेंद्र कोचुरे, चंद्रकांत गाढे, संपर्क प्रमुख राहुलजी गाढे, धनराज घेटे, बाळू निकम, कार्यालय सचिव सदाशीव निकम, सामाजिक कार्यकर्ते रवी छपरीबंद, नंदा बाविस्कर आदी उपस्थित होते.

विविध कार्यालयात संविधान दिन साजरा
रावेर तहसील कार्यालयात तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. रावेर पोलिस स्टेशन, जिल्हा परीषद बांधकाम विभाग, ग्रामीण रुग्णालय, रावेर नगरपालिका, पंचायत समितीत संविधान दिन साजरा करण्यात आला.

भुसावळ ग्रामीण रुग्णालय
भुसावळ : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित स्वतंत्र भारतीय संविधानाला आज मान्यता प्राप्त झाली म्हणून समाजामध्ये या त्रिसूत्रीची अंमलबजावणी होण्यासाठी आजचा दिवस हा भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करण्यात येतो, असे मत शहिद भगतसिंग फाउंडेशनचे अध्यक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे भुसावळ शहराध्यक्ष निलेश रायपुरे यांनी मांडले. भुसावळ येथील ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटरला संविधान दिनानिमित्त त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली. यावेळी प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ.मयूर नितीन चौधरी, डॉ.प्राजक्ता नेवे, दीपक ढगे, युवराज महाजन, महेंद्र सोनवणे, मनोज सावकारे, रजनी बडगुजर, महेश तायडे, दिगंबर पाटील, विकी मेश्राम, शशिकांत अहिरे, विद्या तायडे, सपना इंगळे, रेखा पाटील, अश्विनी बागुल, ज्योती साबळे, श्रीरीन तडवी, आजिम शेख आदी संपूर्ण कर्मचारी वर्ग उपस्थित होता.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !