एर्नाकुलम विशेष गाडीच्या वेळेत बदल


भुसावळ : 1 डिसेंबरपासून हजरत निजामुद्दीन ते एर्नाकुलम विशेष गाडीच्या वेळत बदल करण्यात आला आहे. 02618 हजरत निजामुद्दीन एर्नाकुलम विशेष गाडी दररोज हजरत निजामुद्दीन स्टेशनहुन 5.40 वाजता प्रस्थान करेल आणि तिसर्‍या दिवशी एर्नाकुलम स्टेशनला 7.30 वाजता पोहोचणार आहे. अप दिशेत या गाडीला खंडवा, बर्‍हाणपूर, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड येथे थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02617 एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन विशेष गाडी एर्नाकुलम स्टेशनहुन 1.25 वाजता सुटल्यानंतर हजरत निजामुद्दीन स्टेशनला तिसर्‍या दिवशी 1.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, मनमाड, भुसावळ, बर्‍हाणपूर व खंडवा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !