खासदार पवार यांचा वाढदिवस जनहिताची कामे करून करा साजरा
रावेरात राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी आमदार अरुण पाटील यांचे आवाहन
रावेर : राष्ट्रवादी पक्ष सत्तेत असून संधीचे सोनं करा, पक्षाचे जास्तीत जास्त कामे करून पक्षाचे विचार तळा-गळा पर्यंत पोहचवा, पुढील चार महिन्यांमध्ये निवडणुका असून पक्ष वाढीसाठी सर्वांनी कामाला लागा, खासदार शरद पवार यांचा वाढदिवस जनहिताचे कामे करून साजरा करण्याचा सल्ला माजी आमदार अरुण पाटील यांनी येथील बैठकीत पदाधिकार्यांना दिला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांच्या येणार्या वाढदिवसानिमित्त तसेच आगामी निवडणुकांसंदर्भात रावेर कृषी उपन्न बाजार समितीची बैठक शुक्रवारी झाली.
यांची होती उपस्थिती
बैठकीला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रवादी जिल्हा महिलाध्यक्ष कल्पना पाटील, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष रमेश महाजन, जि.प.चे माजी सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रकाश पाटील, मीनाक्षी चव्हाण, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, शहराध्यक्ष महेमूद शेख, महिला तालुकाध्यक्ष माया बार्हे, नगरसेवक राजेश वानखेडे, आर.के.चौधरी, युवक शहराध्यक्ष प्रणित महाजन, खरेदी-विक्री संघ व्हा.चेअरमन किशोर पाटील, विनोद पाटील ,अशोक पाटील, प्रल्हाद बोंडे, बबलू सावंत, विलास ताठे, मधुकर पाटील, किरण पाटील आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

