भुसावळ विभागातील 29 कर्मचारी सेवानिवृत्त
भुसावळ : रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातून 29 कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने कोरोना प्रादुर्भावामुळे समारंभाचे आयोजन न करता व्हर्चुअल पद्धत्तीने त्यांना शुक्रवारी निरोप देण्यात आला शिवाय या कर्मचार्यांच्या बँक खात्यात तत्काळ नऊ कोटी 88 लाख पाच हजार 227 रुपये रक्कम ऑनलाइन वर्ग करण्यात आली. दरम्यान, 30 नोव्हेंबर रोजी हे कर्मचारी सेवानिवृत्त होणार होते मात्र शनिवार व रविवारी आलेली सुटी तसेच 30 रोजी गुरुनानक जयंतीनिमित्त सुटी असल्याने शुक्रवारीच त्यांना निरोप देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्यांना रेल्वे प्रतिनिधीम्हणून बर्हाणपूर, खंडवा, अकोला, मूर्तिजापुर, भुसावळ, चाळीसगाव आदी ठिकाणी कल्याण निरीक्षकानी जाऊन पी.पी.ओ फोल्डर दिलेत. अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनोज सिन्हा, वरीष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांनी सेवानिवृत्त कर्मचार्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

